IND vs NZ ODI Series भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे मालिका 2026: पहिला सामना 11 जानेवारीला वडोदरामध्ये. सामना वेळ, लाईव्ह स्ट्रीमिंग, चॅनल माहिती सविस्तर वाचा.
IND vs NZ ODI Series Timing and Live Streaming
India vs New Zealand ODI भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची बहुचर्चित वनडे मालिका अखेर सुरू होत आहे. न्यूझीलंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली ही लोकप्रिय जोडी नव्या वर्षात पहिल्यांदाच एकत्र खेळताना दिसणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.
पहिला सामना कुठे होणार?
IND vs NZ ODI time या मालिकेतील पहिला वनडे सामना वडोदराच्या कोटांबी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. गेल्या काही काळात या मैदानावर आंतरराष्ट्रीय सामने होत असून आता रोहित-विराटला प्रत्यक्ष मैदानात पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी होत आहे. सराव सत्रालाही चाहत्यांची तुडुंब उपस्थिती पाहायला मिळाली.
मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक
- 🏏 पहिला वनडे: 11 जानेवारी – वडोदरा (कोटांबी स्टेडियम)
- 🏏 दुसरा वनडे: 14 जानेवारी – सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियम
- 🏏 तिसरा वनडे: 18 जानेवारी – होळकर स्टेडियम, इंदोर
या वनडे मालिकेनंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका 21 ते 31 जानेवारी दरम्यान होणार असून आगामी टी-20 विश्वचषकाच्या तयारीसाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
सामना किती वाजता सुरू होणार?
- 🕜 सामना सुरू होणार: दुपारी 1.30 वाजता
- 🪙 नाणेफेक: दुपारी 1 वाजता
आणखी काही बातमी वाचण्यासाठी – click here
लाईव्ह सामना कुठे पाहता येईल?
- 📡 टीव्हीवर लाईव्ह: स्टार स्पोर्ट्स 1
- 📱 लाईव्ह स्ट्रीमिंग: जिओ हॉटस्टार अॅप
हेही वाचा
Rohit Sharma Record: फक्त 7 धावा! रोहित शर्मा करणार ‘दादा’ गांगुलींना मागे – ऐतिहासिक क्षण जवळ