Jalgaon railway news | 13 एप्रिल 2026 — धरणगाव तालुक्यातील पाळधी रेल्वे स्थानकावर तीन तास अडकलेल्या उधना-हसनपूर एक्सप्रेसमधील प्रवाशांसाठी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील हे खऱ्या अर्थाने ‘देवदूत’ ठरले. कडाक्याच्या उन्हात पाण्यासाठी व्याकुळ झालेल्या प्रवाशांना त्यांनी 250 पाण्याचे जार उपलब्ध करून दिले.
Jalgaon railway news नेमकी घटना काय?
उधना-हसनपूर ही प्रवासी एक्सप्रेस रेल्वे तांत्रिक कारणामुळे सकाळी 11 वाजेपासून पाळधी स्थानकावर थांबवून ठेवण्यात आली होती. रेल्वे लाईन क्लिअर नसल्याने हा थांबा तब्बल तीन तास वाढला. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे आणि स्थानकावर मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले.
उन्हात पाण्यासाठी प्रवाशांची धडपड
सध्या तापमानाचा कडाका वाढलेला असल्याने लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक पाण्यासाठी त्रस्त झाले होते. स्थानकावर पिण्याच्या पाण्याची पुरेशी सोय नसल्याने प्रवाशांमध्ये चिंता पसरली होती.
250 पाण्याच्या जारने दिलासा
ही माहिती मिळताच प्रतापराव पाटील यांनी तात्काळ पाळधी स्थानक गाठले. कोणताही विलंब न करता त्यांनी 250 पाण्याचे जार मागवून प्रवाशांना दिलासा दिला. या मदतीमुळे अडकलेल्या प्रवाशांची तहान भागली आणि मोठा दिलासा मिळाला.
प्रवाशांकडून कौतुकाची थाप
अडचणीच्या काळात मिळालेल्या या मदतीमुळे प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला. “लोकप्रतिनिधी असावा तर असा,” अशा शब्दांत प्रवाशांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
आणखी काही बातमी वाचण्यासाठी – click here
काय म्हणाले प्रतापराव पाटील ?
“रेल्वेच्या तांत्रिक अडचणीमुळे प्रवाशांना होणारा त्रास पाहून मदत करणे आपले कर्तव्य होते. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठांचे हाल पाहवत नव्हते, म्हणूनच तत्काळ पाण्याची व्यवस्था केली.”
आणखी काही बातमी वाचण्यासाठी – click here