Maharashtra Police Bharti 2025 सुरू झाली! राज्यभरात 15631 पोलीस शिपाई, चालक आणि कारागृह शिपाई पदांसाठी भरती जाहीर. अर्जाची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025. पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या.
महाराष्ट्र राज्यातील लाखो युवकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 2025 अखेर जाहीर झाली आहे. अनेक महिन्यांपासून अपेक्षित असलेली ही भरती आता अधिकृतरित्या सुरू झाली असून 29 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे जे उमेदवार पोलीस सेवेत जाण्याचं स्वप्न बघत होते, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.
Maharashtra Police या भरतीद्वारे राज्यातील विविध विभागांमध्ये एकूण 15,631 पदांची भरती केली जाणार आहे. खाली दिलेल्या पदांसाठी अर्ज करता येईल :
Maharashtra Police Bharti 2025 notification
- पोलीस शिपाई: 12,399 पदे
- पोलीस शिपाई चालक: 234 पदे
- बँडस्मन: 25 पदे
- सशस्त्र पोलीस शिपाई: 2,393 पदे
- कारागृह शिपाई: 580 पदे
यामुळे राज्यातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात भरतीची संधी उपलब्ध झाली आहे.
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
- सर्वसाधारण पोलीस शिपाई पदासाठी उमेदवार बारावी (12वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- तर चालक पदासाठी उमेदवाराकडे LMV ड्रायव्हिंग लायसन्स असणे बंधनकारक आहे.
- शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा या दोन्ही टप्प्यांमध्ये पात्रता मिळवणे आवश्यक आहे.
|
पद |
खुला वर्ग |
मागासवर्गीय |
|
पोलीस शिपाई |
18 ते 28 वर्षे |
18 ते 33 वर्षे |
|
पोलीस शिपाई चालक |
19 ते 28 वर्षे |
19 ते 33 वर्षे |
अर्ज प्रक्रिया (Application Process):
- अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असेल.
- अर्ज भरण्यासाठी महाराष्ट्र पोलीस भरतीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- सर्व आवश्यक कागदपत्रे (उदा. शिक्षण प्रमाणपत्र, फोटो, सही, ओळखपत्र) अपलोड करावी लागतील.
- अर्ज सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती नीट तपासा.
Maharashtra Police Bharti 2025 online form
|
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया / महत्त्वाच्या लिंक्स |
|
|
भरतीची जाहिरात (PDF) |
|
|
ऑनलाईन अर्ज – |
|
|
अधिकृत वेबसाईट – |
|
|
इतर महत्त्वाची भरती |
|
अर्ज शुल्क (Application Fees):
- खुला वर्ग: ₹450/-
- राखीव वर्ग: ₹350/-
फी ऑनलाइन पद्धतीने भरता येईल (Debit/Credit Card, UPI, Net Banking इत्यादी माध्यमातून)
Maharashtra Police Bharti 2025 last date
महत्त्वाच्या तारखा (Important Dates):
|
टप्पा |
तारीख |
|
अर्ज सुरू होण्याची तारीख |
29 ऑक्टोबर 2025 |
|
अर्जाची शेवटची तारीख |
30 नोव्हेंबर 2025 |
|
ग्राउंड टेस्ट प्रवेशपत्र |
परीक्षेच्या 7 दिवस आधी |
|
मैदान चाचणी (Physical Test) |
डिसेंबर 2025 (संभाव्य) |
|
मैदानी चाचणी निकाल |
लवकरच उपलब्ध होईल |
|
लेखी परीक्षा प्रवेशपत्र |
परीक्षेच्या 7 दिवस आधी |
|
लेखी परीक्षा तारीख |
जाहीर होणे बाकी |
|
अंतिम निकाल |
लवकरच उपलब्ध होईल |
भरती प्रक्रिया (Selection Process):
- मैदानी चाचणी (Physical Test)
- धावणे, लांब उडी, गोळा फेक इत्यादी कसोट्या घेतल्या जातील.
- पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र निकष असतील.
- लेखी परीक्षा (Written Exam)
- सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, गणित, तार्किक विश्लेषण आणि मराठी विषयांवर आधारित प्रश्नपत्रिका.
- दस्तऐवज पडताळणी (Document Verification)
नोकरी ठिकाण:
महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये भरती होणार आहे.
महत्त्वाची सूचना:
Maharashtra police bharti 2025 website पोलीस भरती ही अत्यंत पारदर्शक पद्धतीने केली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही मध्यस्थ व्यक्तीच्या फसवणुकीपासून सावध राहावं. अधिकृत वेबसाइट आणि पोलीस विभागाच्या सोशल मीडिया पेजवरूनच माहिती घ्यावी.
Related Update
8th Pay Commission 2025 : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनर्सना कधी मिळणार फायदा
उमेदवारांसाठी टिप्स:
- अर्ज शेवटच्या क्षणी न करता लवकरात लवकर भरावा.
- शारीरिक तयारीवर भर द्यावा — रोज धावण्याचा सराव करा.
- मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवून तयारी वाढवा.
- अधिकृत सूचनांसाठी दररोज वेबसाइट तपासा.तत
तुम्ही अर्ज केला का ?