Asia Cup 2025 india vs Bangladesh : आज भारत आणि बांगलादेश यांच्यात एशिया कप 2025 सुपर-4 मध्ये धडाकेबाज लढत. सामना LIVE कुठे पाहता येईल, हेड-टू-हेड आकडेवारी, टीम इंडिया चा तुफानी T20 फॉर्म – जाणून घ्या सविस्तर!
Asia cup 2025 india vs bangladesh live | एशिया कप 2025 मध्ये आज एक भन्नाट सामना रंगणार आहे. भारत आणि बांगलादेश हे दोन आशियाई प्रतिस्पर्धी सुपर-4 टप्प्यात आमनेसामने येणार आहेत. हा सामना 24 सप्टेंबर रोजी संध्याकाळी ८ वाजता (भारतीय वेळेनुसार) सुरू होणार आहे. या सामन्याचं महत्त्व इतकं प्रचंड आहे की जो संघ जिंकेल त्याला थेट फायनलमध्ये प्रवेश मिळणार आहे.
Asia Cup 2025 india vs Bangladesh – हेड टू हेड
Asia cup 2025 india vs bangladesh highlights | टी20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत भारत आणि बांगलादेश 17 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये टीम इंडियाने तब्बल 16 सामने जिंकले असून बांगलादेशला फक्त 1 विजय मिळवता आला आहे.
मागचा सामना ऑक्टोबर 2024 मध्ये खेळला गेला होता आणि तो बांगलादेशसाठी एका भीषण स्वप्नासारखा ठरला. टीम इंडियाने केवळ फलंदाजीच नव्हे तर गोलंदाजीतही जबरदस्त प्रदर्शन केलं होतं.
- संजू सॅमसन ने फक्त 47 चेंडूत 111 धावा करून भल्याभल्यांच्या कपाळावर आठ्या आणल्या.
- सूर्यकुमार यादव ने 35 चेंडूत 75 धावा फटकावून सॅमसनला उत्तम साथ दिली.
- रियान पराग ने 13 चेंडूत 34 धावा तर हार्दिक पांड्या ने फक्त 18 चेंडूत 47 धावा करत तुफानी खेळी केली.
भारताने 20 षटकांत 297/6 असा प्रचंड डोंगर उभारला. प्रत्युत्तरात बांगलादेश 20 षटकांत 164/7 पर्यंतच मजल मारू शकला आणि भारताने 133 धावांनी दणदणीत विजय मिळवला.
गोलंदाजीत रवी बिश्नोई चमकला. त्याने 4 षटकांत 30 धावा देत 3 बळी टिपले.
भारताचा गेल्या 5 वर्षांचा T20I फॉर्म
भारताचा टी20 क्रिकेटमधील गेल्या 5 वर्षांचा फॉर्म भन्नाट आहे.
- 2021 पासून आजवर भारताने 88 सामने खेळले असून त्यापैकी 64 जिंकले आहेत.
- फक्त 21 पराभव झाले आहेत, तर 2 सामने बरोबरीत आणि 1 सामना रद्द झाला आहे.
- म्हणजेच टीम इंडियाने गेल्या पाच वर्षांत तब्बल 73% विजयाचा दर कायम ठेवला आहे.
याच काळात भारताने बांगलादेशविरुद्ध 6 सामने खेळले आणि सर्व सामन्यांत विजय मिळवला.
इतकंच नव्हे तर, 2011 पासून आजवर भारताने दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्ध प्रत्येकी 4 वेळा पराभव स्वीकारला आहे. श्रीलंका आणि वेस्ट इंडिजने प्रत्येकी 3 वेळा, तर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि पाकिस्तानने प्रत्येकी 2 वेळा टीम इंडियाला हरवलं आहे. झिम्बाब्वेविरुद्धही भारताला एकदा पराभव पत्करावा लागला आहे.
हेही वाचा | गोवा शिपयार्ड लिमिटेड भरती 2025! 62 पदांसाठी अर्ज सुरू; पात्रता, पगार आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
भारत vs बांगलादेश – सामना LIVE कुठे पाहाल?
Asia cup 2025 india vs bangladesh live score क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी म्हणजे हा सामना तुम्ही मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्हीवर कुठेही पाहू शकता.
- मोबाईल / वेबवर: SonyLIV App आणि Website तसेच OTTplay वर सामना LIVE उपलब्ध असेल.
- टीव्हीवर: Sony Sports Network वर थेट प्रक्षेपण पाहता येईल.
- सामना सुरू होईल आज संध्याकाळी ८ वाजता (भारतीय वेळेनुसार).
फायनलची तिकीट – कोण मिळवणार?
सुपर-4 मध्ये भारत आणि बांगलादेश दोघांनीही पहिले सामने जिंकले आहेत. त्यामुळे हा सामना जिंकणारा संघ थेट फायनलमध्ये आपली जागा पक्की करेल. टीम इंडियाचा तुफानी फॉर्म पाहता क्रिकेटप्रेमींच्या नजरा या सामन्याकडे खिळून राहणार हे नक्की.