philippines earthquake 2025 | फिलिपाईन्समध्ये 7.6 तीव्रतेचा भूकंप; दावाओ हादरलं, दोन ठार. त्सुनामी आणि आफ्टरशॉक्सचा इशारा, नागरिकांना उंच ठिकाणी हलवण्याचे आवाहन.
Philippines earthquake 2025 | सोशल मीडियावर भीषण दृश्ये
दुसऱ्या क्लिपमध्ये एका ऑफिसमध्ये टेबलवरील फायली आणि बॉक्स जमिनीवर पडताना, ट्यूबलाईट्स झुलताना आणि विजा चमकत बंद होताना दिसतात. कर्मचारी घाबरून टेबलखाली आसरा घेत आहेत.
रस्त्यावर तर काही नागरिकांना हलता जमिनीवर हात गुडघ्यांवर बसून तोल सांभाळावा लागला, इतकी तीव्र कंपने जाणवली.
अधिकाऱ्यांचा इशारा – आफ्टरशॉक्स आणि त्सुनामीचा धोका
Tsunami Warning Philippines – स्थानिक अधिकाऱ्यांनी आफ्टरशॉक्स आणि त्सुनामीचा गंभीर इशारा दिला आहे. किनाऱ्यावरील नागरिकांनी तत्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे प्रशासनाचे आवाहन आहे.
फिलिपाईन इन्स्टिट्यूट ऑफ वॉल्कॅनॉलॉजी अँड सिस्मॉलॉजी (PHIVOLCS) ने सांगितले की, हा भूकंप समुद्रात मनाय या शहराच्या दक्षिणपूर्वेस 62 किलोमीटर अंतरावर केंद्रित होता. भूकंपाची खोली फक्त 10 किलोमीटर इतकी असल्याने तो अधिक तीव्रतेने जाणवला.
https://x.com/RT_com/status/1976480007234126056
पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटर, हवाई येथून दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून 300 किमी पर्यंत त्सुनामी लाटा निर्माण होऊ शकतात. काही फिलिपाईन किनाऱ्यांवर 3 मीटर (सुमारे 10 फूट) उंच लाटा येण्याची शक्यता आहे, तर इंडोनेशिया आणि पलाऊ येथे लहान लाटा पोहोचू शकतात.
“ताबडतोब उंच ठिकाणी जा” – प्रशासनाचा इशारा
ऑफिस ऑफ सिव्हिल डिफेन्सचे उपप्रशासक बर्नार्डो राफेलिटो आलेखांद्रो IV यांनी सांगितले की, दावाओ ओरिएंटलपासून सहा किनारी प्रांतांपर्यंत त्सुनामी लाटा दोन तासांत पोहोचू शकतात.
“किनारी भागातील लोकांनी तत्काळ उंच ठिकाणी किंवा अंतर्भागात हलावे. प्रशासनाचे पुढील निर्देश मिळेपर्यंत तिथेच थांबावे,” असा इशारा त्यांनी दिला.
“बोटींचे मालकांनी त्यांच्या नौका सुरक्षित ठिकाणी नेऊन बांधाव्यात, किनाऱ्यापासून दूर राहावे,” असेही ते म्हणाले.
नुकताच 6.9 तीव्रतेचा भूकंप – अजून सावरायचं बाकी!
Davao Earthquake | याच फिलिपाईन्समध्ये काही दिवसांपूर्वीच 30 सप्टेंबर रोजी 6.9 तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्या हादऱ्यात किमान 74 जणांचा मृत्यू झाला आणि हजारो लोक बेघर झाले होते. हा भूकंप सेबू प्रांतातील बोगो शहरात आणि आसपासच्या गावांमध्ये झाला होता.
सतत आपत्तींच्या विळख्यात फिलिपाईन्स
हेही वाचा.
सिंह राशीला नशीबाची साथ, कन्या राशीसाठी आव्हानांचा आठवडा! जाणून घ्या 6 ते 12 ऑक्टोबरचं राशीभविष्य
याशिवाय दरवर्षी 20 हून अधिक वादळं आणि चक्रीवादळं या देशावर धडकतात. त्यामुळे सरकार आणि स्वयंसेवी संस्था यांना नेहमीच आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीत राहावे लागते.
हेही वाचा