Vande Mataram New Rules 2025 केंद्र सरकारने ‘वंदे मातरम’बाबत नवे नियम जाहीर केले. आता सरकारी कार्यक्रमात पूर्ण 3 मिनिटे 10 सेकंद गीत वाजवले जाणार. उभे राहणे अनिवार्य. जाणून घ्या संपूर्ण नियमावली आणि इतिहास.
Vande Mataram New Rules 2025 काय आहेत नवे नियम?
केंद्र सरकारने राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम’ Vande Mataram संदर्भात महत्त्वाचे नवे निर्देश जारी केले आहेत. गृह मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या नियमावलीनुसार, आता सरकारी कार्यक्रम, सरकारी शाळांमधील समारंभ तसेच इतर औपचारिक कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम’ वाजवणे अनिवार्य असेल. राष्ट्रीय गीताच्या सन्मानार्थ सर्वांना उभे राहणे बंधनकारक असेल. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी ‘वंदे मातरम’ला १५० वर्ष पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर देशभर विविध उपक्रम राबवण्यात आले होते. त्याचाच भाग म्हणून ही नवी नियमावली जाहीर करण्यात आल्याचे सांगितले जाते.
National Song India rules आता पूर्ण 3 मिनिटे 10 सेकंदाचे गायन
नव्या निर्देशानुसार, सहा कडव्यांचे ‘वंदे मातरम’ पूर्ण 3 मिनिटे 10 सेकंद वाजवले जाईल. यापूर्वी केवळ दोन कडवी (सुमारे 65 सेकंद) गायली जात होती. झेंडा वंदन, राष्ट्रपती आणि राज्यपालांचे कार्यक्रम, त्यांचे भाषण तसेच राष्ट्राला संबोधित करण्यापूर्वी हे राष्ट्रीय गीत वाजवले जाणार आहे. जर राष्ट्रगीत जन गण मन आणि राष्ट्रीय गीत एकत्र वाजवायचे असतील, तर प्रथम राष्ट्रगीत आणि त्यानंतर ‘वंदे मातरम’ वाजवले जाईल. सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि संवैधानिक संस्थांना यासंदर्भात स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
सिनेमागृहात अनिवार्य नाही
Vande Mataram Guidelines 2025 माध्यमांनुसार, 28 जानेवारी रोजी केंद्र सरकारने 10 पानांची नियमावली प्रसिद्ध केली. यामध्ये कोणकोणत्या कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम’ अनिवार्य असेल याची सविस्तर यादी देण्यात आली आहे. दरम्यान, सिनेमागृहांना या नियमातून वगळण्यात आले आहे. ‘वंदे मातरम’ हे गीत सर्वप्रथम बंकिम चंद्र चट्टोपाध्याय यांच्या आनंदमठ या कादंबरीत 7 नोव्हेंबर 1875 रोजी प्रसिद्ध झाले. तेव्हापासून हे गीत भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा गजर बनले. 1896 मध्ये रवींद्रनाथ ठाकुर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात हे गीत गायले. त्यानंतर ते अधिक लोकप्रिय झाले. 1905 मध्ये बंगाल फाळणीविरोधातील आंदोलनात ‘वंदे मातरम’चा प्रभावी वापर झाला. 24 जानेवारी 1950 रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी संविधान सभेत निवेदन करताना ‘वंदे मातरम’ला राष्ट्रगीताइतकाच सन्मान दिला जाईल, असे स्पष्ट केले. त्यानंतर या गीताला राष्ट्रगीताप्रमाणेच मान्यता मिळाली.
आणखी काही बातमी वाचण्यासाठी – click here
संसदेत गोंधळ
2025 च्या अखेरीस झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात ‘वंदे मातरम’च्या 150 वर्षांवर चर्चा झाली. लोकसभा आणि राज्यसभेत यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा पुढे आणल्याचा आरोप काँग्रेसने केंद्र सरकारवर केला.
Related Update