T20 World Cup 2026
T20 World Cup 2026 मध्ये ऑस्ट्रेलिया पहिल्याच फेरीत बाहेर. पल्लेकेले येथील सामना रद्द झाल्याने मोठा फटका. सुपर-8 मध्ये भारताचे सामने दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्ध. संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या.
T20 WC 2026 Marathi News ऑस्ट्रेलियाचा संघ आयसीसी टी20 विश्वचषक 2026 (ICC T20 International World Cup 2026) च्या पहिल्याच फेरीतून बाहेर पडला आहे. झिम्बाब्वेविरुद्धचा पराभव महागात पडला आणि अखेर स्पर्धेतील त्यांचे आव्हान संपुष्टात आले.
श्रीलंकेतील पल्लेकेले येथे झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला. सामना न झाल्यामुळे झिम्बाब्वेला मोठा फायदा झाला, पण सर्वात मोठा फटका बसला तो ऑस्ट्रेलियाला. या निकालानंतर ऑस्ट्रेलियाचा प्रवास थांबला.
दरम्यान, सोशल मीडियावर पुन्हा एकदा 2023 च्या वनडे विश्वचषकातील चर्चित फोटो व्हायरल होत आहे. ICC Cricket World Cup 2023 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर विजय मिळवला होता. त्यावेळी कर्णधार Australia Out- Mitchell Marsh याचा एक फोटो समोर आला होता, ज्यात त्याने विश्वचषक ट्रॉफीवर पाय ठेवले होते. त्या कृतीवर मोठी टीका झाली होती आणि अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या.
योगायोगाने, आता त्याच मिचेल मार्शच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्याच फेरीतून बाहेर पडला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर “कर्माचा फटका” अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
ऑस्ट्रेलियाचा शेवटचा सामना 20 फेब्रुवारीला ओमानविरुद्ध होणार आहे. मात्र, या सामन्याला आता कोणतेही महत्त्व उरलेले नाही, कारण दोन्ही संघ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. ऑस्ट्रेलिया बाहेर पडल्यामुळे झिम्बाब्वेचा संघ सुपर-8 मध्ये पोहोचला आहे. पाकिस्तानने पुढील सामना जिंकल्यास त्यांनाही संधी मिळू शकते.
Super 8 India Matches सुपर-8 मध्ये भारताचे सामने (T20 WC 2026)
ऑस्ट्रेलिया बाहेर पडल्यामुळे आता भारताचा सामना खालील संघांशी होणार आहे:
- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – अहमदाबाद
- भारत विरुद्ध झिम्बाब्वे – चेन्नई
- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज – कोलकाता
क्रिकेट चाहत्यांसाठी आता खरी रंगत सुपर-8 मध्ये पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा
BMC Bharti 2026 : 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! ₹56,900 पगाराची मोठी भरती जाहीर
आणखी काही बातमी वाचण्यासाठी – click here