बातम्या स्थानिक बातम्या ताजी बातमी महाराष्ट्र देश विदेश राजकारण योजना / नोकरी क्रीडा अर्थविश्व टेकतंत्र मनोरंजन लाईफस्टाईल अध्यात्म वेब स्टोरी

Shinde Sena BJP Conflict “महाशक्तीचा दणका! शिंदेसेना राजकीय अडचणीत; ‘भाईंकडे’आता एकच मार्ग?”

On: November 20, 2025 6:32 PM
Follow Us:
Shinde Sena BJP Conflict
---Advertisement---

Shinde Sena BJP Conflict महाराष्ट्रात महायुतीतील तणाव शिगेला! भाजपकडून शिंदेसेनेचे नेते खेचण्याची मोहिम, मंत्र्यांचा कॅबिनेट बहिष्कार, फडणवीस-शहा बैठक आणि 2029 च्या स्वबळाच्या तयारीमुळे शिंदेसेना चिंतेत. भाईंकडे आता कोणता पर्याय शिल्लक?

Shinde Sena BJP Conflict महाशक्ती पाठिशी ते महाशक्ती लागली पाठी! शिंदेसेना अडचणीत; भाईंकडे आता एकच पर्याय

Maharashtra Politics News राज्यातील सत्ताधारी महायुतीत भाजप आणि शिंदेसेनेमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भाजपनं शिंदेसेनेच्या काही महत्त्वाच्या नेत्यांना आपल्याकडे खेचण्यास सुरुवात केल्यानं शिंदेसेनेत नाराजी उसळली आहे. Eknath Shinde Latest News या नाराजीचा परमोच्च नाट्यमय क्षण दोन दिवसांपूर्वी पाहायला मिळाला, जेव्हा शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार घातला. कॅबिनेटमध्ये एकटे एकनाथ शिंदेच उपस्थित होते.

ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवलीमध्ये सेनेच्या माजी नगरसेवकांना भाजपमध्ये सामावून घेतल्यानं ही नाराजी फुटली. शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या भागातच भाजपनं अशी हालचाल केल्यानं पक्षात अस्वस्थता वाढली.

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात असे अनेक प्रयोग पाहायला मिळाले—युती, आघाड्या, एकपक्षीय सरकार… पण सत्तेतील एका घटकपक्षाच्या सर्व मंत्र्यांचा कॅबिनेटवरील बहिष्कार Maharashtra Cabinet Boycott  हा प्रकार कधी घडला नव्हता. यावरून नाराजी किती गंभीर आहे याची कल्पना येऊ शकते.

बहिष्कारानंतर शिंदेसेनेचे मंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी गेले. मात्र, फडणवीसांनी त्यांचा खरपूस समाचार घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. उल्हासनगरातूनच तुम्ही सुरुवात केली होती, याची आठवणही त्यांनी खास करून मंत्र्यांना करून दिली.

यामुळेच शिंदेंनी थेट दिल्लीकडे रवाना होत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. कधीकाळी “महाशक्ती पाठीशी आहे” असं सांगून बंड पुकारणारे शिंदे, आता त्याच महाशक्तीकडून येणारे दबाव सहन करताना दिसत आहेत. जवळपास 50 मिनिटांची बैठक झाली असली तरी, शिंदेंच्या हातात काही ठोस गोष्ट पडल्याचे दिसत नाही.

भाजपने 2029 ची तयारी आत्ताच सुरू केली आहे. तेही स्वबळावर लढण्याची! याची घोषणा स्वतः अमित शहांनी केली आहे. “आम्हाला कुबड्यांची गरज नाही,” असंही ते अलीकडेच महाराष्ट्र दौऱ्यात म्हणाले होते. त्यामुळे भाजपला आपले विस्तारकाम थांबवण्याचे निर्देश देण्याची शक्यता जवळपास नाहीच.

राज्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण जलद गतीने पक्षविस्तार करत आहेत. याबाबत शिंदेंनी तक्रार केली तरी त्याचा फारसा परिणाम होणं कठीण आहे. उद्धव ठाकरे हिंदुत्वापासून दूर गेल्याचा आरोप करत शिंदे भाजपसोबत आले. त्यामुळे आता भाजपची साथ सोडणं त्यांच्यासाठी अवघड आहे. सत्ता सोडून विरोधी बाकांवर बसणं तर त्याहून कठीण. शिंदे बंड करताना मोठी आमदारफौज सोबत होती कारण ते सत्तेतून सत्तेत जात होते. पण सत्तेतून विरोधी बाकावर जाण्यास किती जण तयार होतील? प्रश्न मोठा आहे.

Related Update

OnePlus 15R धमाकेदार येतोय! भारतात टीझर रिलीज, किंमत, फीचर्स आणि डिझाइनची मोठी लीक!

महाविकास आघाडीच्या काळातील केंद्रीय यंत्रणांच्या कारवाया अजूनही विसरायच्या झालेल्या नाहीत. चौकशा थांबल्या आहेत, बंद नाहीत—ही जाणीव शिंदेसेनेला आहे. 2019 मध्ये भाजपला दूर ठेवण्याचा जो निर्णय ठाकरे-पवारांनी घेतला होता, त्याचा परिणाम त्यांना सहन करावा लागला. आता अगदी त्याच वळणावर शिंदे उभे आहेत. त्यांच्यासमोर एकच मार्ग:
शक्त तितका प्रतिकार करायचा आणि दिवस ढकलत राहायचा!

कधीकाळी पाठीशी असलेली महाशक्ती… आता पाठीमागे लागलेली आहे.

हेही वाचा

सोन्यातील गुंतवणुकीत सापळा! चुकीचा निर्णय घेतला तर गमवाल आयुष्यभराची कमाई

Reporter

मी पत्रकार. राजकारण, क्रीडा, गॅजेट्स, सोशल मीडिया, स्टार्टअप्स, अर्थव्यवस्था आणि जागतिक घडामोडींवर लक्ष ठेवतो/ठेवते. माझा हेतू वाचकांना विश्वासार्ह, सोप्या आणि आकर्षक भाषेत ताज्या बातम्या पोहोचवणे आहे."

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment

साप्ताहिक राशिभविष्य 27 Oct – 2 Nov 2025: पैसा, नोकरी, फ्लॅट! तुमचं नशीब काय सांगतं? Samsung ने लॉन्च केला जबरदस्त Galaxy XR हेडसेट “20 ते 26 ऑक्टोबर 2025 साप्ताहिक राशीभविष्य | महालक्ष्मी योगात चमकणार ७ राशींचं नशीब!” महाराष्ट्रातील १० प्रसिद्ध आणि सर्वात मोठे किल्ले | Top 10 Forts in Maharashtra सई ताम्हणकरचा धनत्रयोदशी लूक पारंपरिक 💛 मेंदी रंगाच्या घागरामध्ये मंत्रमुग्ध करणारा अंदाज आदित्य-मंगल योग 2025: भाग्याचा आठवडा सुरू