Shahid Afridi ने दिला सल्ला |माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी यांनी PCB अध्यक्ष व गृहमंत्री मोहसिन नकवी यांना एक पद सोडण्याचा सल्ला दिला. आशिया कप वाद, भारताविरुद्ध पराभव आणि नकवींच्या अनेक जबाबदाऱ्यांवर पाकिस्तान क्रिकेटमध्ये चर्चा रंगली आहे
Shahid Afridi ने दिला सल्ला : “मोहसिन नकवी यांनी एक पद सोडावं, पाकिस्तान क्रिकेटला हवी पूर्णवेळ लक्ष देणारी नेतृत्व”
Pakistan Cricket News : पाकिस्तानचे माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी यांनी पुन्हा एकदा पाकिस्तान क्रिकेटच्या भविष्यासंदर्भात मोठं वक्तव्य करत चर्चा रंगवली आहे. त्यांनी सध्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) अध्यक्ष आणि देशाचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांना थेट सल्ला दिला आहे – “एका जागेवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर पाकिस्तान क्रिकेटचं नुकसान होईल.”
आफ्रिदी यांचं म्हणणं स्पष्ट आहे की, एकाच वेळी दोन जबाबदाऱ्या सांभाळणं शक्य नाही. गृहमंत्री ही गंभीर जबाबदारी आहे आणि PCB चे अध्यक्षपद म्हणजे क्रिकेट विश्वातील प्रचंड मोठं काम. हे दोन्ही जबाबदाऱ्या एकत्र सांभाळण्याचा प्रयत्न होत असेल, तर त्याचा तोटा थेट क्रिकेटला होतो.
नकवी यांच्या कार्यकाळातील आव्हानं
India vs Pakistan मोहसिन नकवी यांनी २०२४ पासून PCB चे अध्यक्षपद स्वीकारलं. पण त्यांचा कार्यकाळ फारसा गाजलेला नाही. पाकिस्तानला घरच्या मैदानावर कसोटी मालिकांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही पाकिस्तान चमक दाखवू शकला नाही. त्यानंतर नुकत्याच झालेल्या आशिया कपमध्ये पाकिस्तानचा प्रवास चढ-उतारांनी भरलेला होता.
नवीन प्रशिक्षक माइक हेसेन यांच्या मार्गदर्शनाखाली काही सुधारणा दिसल्या, परंतु भारतीय संघाविरुद्ध सलग तीन पराभवांमुळे पाकिस्तानचं मनोबल डळमळलं. त्यामुळेच क्रिकेट चाहत्यांत नाराजीचा सूर उमटला.
आफ्रिदीचा थेट इशारा
ACC Chairman Controversy आफ्रिदी यांनी दिलेलं वक्तव्य पाकिस्तानात चर्चेचं केंद्रबिंदू ठरलं आहे. त्यांनी ‘टेलिकॉम आशिया स्पोर्ट’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं –
“माझी नकवी साहेबांना विनंती आहे की हे दोन्ही पदं मोठी आहेत. गृहमंत्रालय आणि PCB ही दोन वेगळी क्षेत्रं आहेत. क्रिकेटसाठी वेळ, ऊर्जा आणि सतत लक्ष हवं. केवळ सल्लागारांवर अवलंबून राहून काही होत नाही. त्यांना स्वतःला क्रिकेटविषयी फारशी माहिती नाही, हे ते मान्य करतात. त्यामुळे सक्षम आणि अनुभवी क्रिकेट जाणकारांना PCB मध्ये आणणं गरजेचं आहे.”
आशिया कपमधील वाद
Asia Cup 2025 मध्ये नकवी हे आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष म्हणून चर्चेत राहिले. पण अंतिम सामन्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. भारताने आशिया कप जिंकला, मात्र भारतीय खेळाडूंनी नकवी यांच्याकडून विजेतेपदाची ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. कारण – नकवी यांचे पूर्वीचे भारतविरोधी राजकीय वक्तव्य.
या घटनेमुळे वातावरण तणावपूर्ण झालं. यानंतर नकवी यांनीच ट्रॉफी घेऊन मैदान सोडल्याची माहिती पुढे आली. भारतीय माध्यमांनी या प्रसंगावर मोठी टीका केली.
नकवी यांचा पलटवार
या सर्व वादावर नकवी यांनी थेट सोशल मीडियावरून प्रतिक्रिया दिली. ‘X’ (माजी ट्विटर) वर त्यांनी लिहिलं –
“भारतीय मीडिया फक्त खोट्यावर जगतो. मी कधीही BCCI कडे माफी मागितलेली नाही आणि कधी मागणारही नाही. हे सगळं बनावट आहे, ही फक्त स्वस्त प्रोपगंडा आहे. भारत राजकारण क्रिकेटमध्ये आणून खेळाची खरी भावना नष्ट करतोय.”
दबावात नकवी, चर्चेत पाकिस्तान क्रिकेट
सध्या नकवी यांच्या खांद्यावर तीन-तीन जबाबदाऱ्या आहेत – गृहमंत्री, PCB अध्यक्ष आणि ACC चे प्रमुख. या सर्व भूमिका एकत्र सांभाळताना ते प्रभावी ठरत नाहीत, अशी टीका वाढत चालली आहे. क्रिकेटचे तज्ज्ञ, माजी खेळाडू आणि चाहत्यांमध्ये सतत चर्चा सुरू आहे की पाकिस्तान क्रिकेटला खरोखर पूर्णवेळ आणि निष्पक्ष नेतृत्व हवं आहे.
हेही वाचा
Asia Cup 2025 Trophy Drama : पाकिस्तान मंत्र्याने ट्रॉफी नेली, भारतीय संघाचा नकार; बीसीसीआयचा संताप
आफ्रिदींच्या या सल्ल्यामुळे पाकिस्तान क्रिकेटमधील सत्तासंघर्ष, राजकीय हस्तक्षेप आणि व्यवस्थापनातील कमकुवत बाजू पुन्हा एकदा उघडकीस आल्या आहेत.