India Retirement Index | IRIS सर्वेक्षणानुसार १० पैकी ७ भारतीयांना निवृत्ती जीवनासाठी १ कोटी रुपये पुरेसे वाटतात. निवृत्ती तयारी, गुंतवणूक वाढ, पश्चिम भारतात सर्वाधिक गुण आणि तज्ज्ञांचे मत जाणून घ्या.
India Retirement Index | निवृत्तीला १ कोटी पुरेसे? भारतीयांचे धक्कादायक उत्तर
India Retirement Index – देशातील नागरिकांमध्ये आर्थिक साक्षरता जरी वाढत असली तरी “निवृत्तीसाठी नेमका किती निधी लागतो?” या प्रश्नावर अजूनही गोंधळ कायम आहे. अग्रगण्य विमा कंपनी ॲक्सिस मॅक्स लाइफ इन्शुरन्सच्या ‘इंडिया रिटायरमेंट इंडेक्स स्टडी (IRIS)’ India Retirement Indexअहवालानुसार, भारतीय नागरिकांना निवृत्तीच्या खर्चाचा अचूक अंदाज नसल्याचे चित्र पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. या पाहणीत एक धक्कादायक निष्कर्ष समोर आला—१० पैकी ७ भारतीयांना वाटते की निवृत्तीचे जीवन सुरळीत चालवण्यासाठी १ कोटींचा निधी पुरेसा असू शकतो.
पश्चिम भारत—ज्यात मुंबई व महाराष्ट्राचा समावेश होतो—निवृत्ती तयारीच्या बाबतीत पुन्हा अव्वल ठरला आहे. २०२२ मध्ये ४८ गुणांची नोंद करणाऱ्या या विभागाने २०२५ मध्ये थेट ५५ गुणांवर झेप घेतली, असे अहवालात नमूद करण्यात आले.
IRIS निर्देशांकात भारताची स्थिती कशी?
retirement planning संपूर्ण देशाचा एकूण ‘निवृत्ती तयारी निर्देशांक’ (IRIS) २०२२ मधील ४४ वरून २०२5 मध्ये ४९ गुणांवर पोहोचला आहे.
हा वाढता निर्देशांक भारतीयांमध्ये:
- नियमित आरोग्य तपासण्या,
- व्यायाम आणि आरोग्य सवयी,
- तसेच विमा संरक्षण वाढ
याबाबत जागरूकता वाढल्याचे दर्शवतो. पण वास्तविक भविष्यातील खर्च पाहता हा निधी पुरेसा असेल का, हा प्रश्नही उपस्थित होतो.
१ कोटी खरंच पुरेसे आहेत का?
best retirement plan India | या प्रश्नावर ॲक्सिस मॅक्स लाईफ इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ सुमित मदन म्हणाले — “आरोग्य खर्च झपाट्याने वाढत आहेत. कुटुंबातील बचत दर कमी होत आहेत. अशा परिस्थितीत निवृत्तीसाठी ध्येय ठेवलेला १ कोटींचा निधी प्रत्यक्षात अपुरा ठरू शकतो.” मदान यांच्या मते, पश्चिम भारतातील लोक आर्थिक तयारीत अधिक सक्रिय आणि सजग आहेत, ज्यामुळे हा विभाग राष्ट्रीय सरासरीपेक्षा पुढे आहे.
निवृत्तीसाठी गुंतवणूक वाढली
पाहणी अहवालानुसार:
- २०२२ मध्ये निवृत्ती गुंतवणूक: ६२%
- २०२५ मध्ये निवृत्ती गुंतवणूक: ७२%
ही वाढ राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे आणि भारतातील गुंतवणूकदार ‘जागरूकतेपासून कृतीकडे’ वाटचाल करत असल्याचे स्पष्ट होत आहे.
ही पाहणी कोणी केली?
IRIS सर्वेक्षण कंटार (Kantar) या जगप्रसिद्ध डेटा आणि विश्लेषण कंपनीच्या भागीदारीत करण्यात आले. ० ते १०० या मोजपट्टीवर निवृत्ती तयारीचे तीन प्रमुख आधार तपासण्यात आले:
- आर्थिक तयारी
- आरोग्य तयारी
- भावनिक तयारी
Related Update
OnePlus 15R धमाकेदार येतोय! भारतात टीझर रिलीज, किंमत, फीचर्स आणि डिझाइनची मोठी लीक !
सोन्यातील गुंतवणुकीत सापळा! चुकीचा निर्णय घेतला तर गमवाल आयुष्यभराची कमाई
निवृत्ती नियोजन कधी सुरू करावे?
अजूनही मोठ्या प्रमाणावर नागरिकांना आपल्या निवृत्ती नियोजनाची सुरुवात कधी करावी याची स्पष्टता नाही.
- ५०% लोकांचे मत: निवृत्ती नियोजन ३५ वर्षांपूर्वी सुरू करावे
- तज्ज्ञांचे मत:
कमाई सुरू होताच निवृत्ती नियोजन सुरू केले पाहिजे
पण निवृत्ती नियोजन Indian financial planning कसे करायचे, कोणत्या साधनांत गुंतवणूक करायची याबद्दल अजूनही नागरिकांमध्ये अस्पष्टता मोठी आहे.
हेही वाचा