Repo Rate | RBI डिसेंबरमध्ये रेपो रेट कमी करू शकते. 25 बेसिस पॉइंट कपात झाल्यास EMI कमी होणार. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या संकेतामुळे कर्जदारांमध्ये उत्सुकता. पूर्ण माहिती वाचा.
Home Loan Interest Cut देशातील करोडो कर्जदारांसाठी आणि नवीन होम लोन, कार लोन किंवा पर्सनल लोन घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर येऊ शकते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) या वर्षाच्या अखेरीस रेपो रेटमध्ये आणखी कपात करण्याची शक्यता वाढली आहे. यामुळे EMIमध्ये दिलासा मिळण्याचे संकेत मिळत आहेत आणि लोकांच्या हातात अधिक पैसा खुळखुळणार आहे.
Repo Rate RBI रेपो रेट कपात – डिसेंबरमध्ये मोठा निर्णय?
RBI MPC Meeting | रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी देशाच्या आर्थिक स्थितीबद्दल सकारात्मक माहिती दिली आहे. डिसेंबरमध्ये होणाऱ्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात (MPC Meeting) रेपो रेट कपात होण्याचे संकेत त्यांनी दिले.
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात MPC बैठक होणार आहे. त्याआधीच गव्हर्नरांनी सध्याचे आर्थिक निर्देशक (Economic Indicators) रेपो दर कमी करण्यास अनुकूल असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे EMI कमी होण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.
MPC आधीच संकेत देऊन ठेवले होते!
गव्हर्नरांनी सांगितले की, ऑक्टोबरमधील MPC बैठकीतही रेपो रेट कपातीची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. नवीन आकडेवारी या शक्यतेला आणखी पुष्टी देत आहे. 3 ते 5 डिसेंबरदरम्यान MPC बैठक होणार असल्याने कर्जदारांच्या अपेक्षा शिगेला पोहोचल्या आहेत. फेब्रुवारी ते जूनदरम्यान RBI ने सुमारे 100 बेसिस पॉइंट्स व्याजदर कमी केले होते. ऑगस्ट आणि ऑक्टोबरमध्ये रेपो रेट 5.5% वर स्थिर ठेवण्यात आला.
Repo Rate रेपो रेट कपात – किती? केव्हा?
जबाबदार स्वरात गव्हर्नर म्हणाले—
मध्यवर्ती बँकेचे पहिले ध्येय किंमत स्थिरता (Inflation Control) आहे आणि दुय्यम ध्येय अर्थव्यवस्थेच्या वाढीस मदत करणे आहे. त्यामुळे RBI आक्रमक कपात करणार नाही, पण आवश्यक ते निर्णय नक्की घेईल.
रुपया घसरतोय, पण EMI कमी होण्याची आशा जिवंत
डॉलरच्या तुलनेत रुपया सातत्यानं कमजोर होत आहे. पुढील महिन्यात तर रुपया निचांकी पातळीवर जाण्याची भीती व्यक्त होत आहे. अशा स्थितीत EMI कमी होण्याची शक्यता लोकांना स्वप्नवत वाटत असली तरी RBI कडून वर्षाअखेरीस कपात झाली तर घरबांधणी, रिअल इस्टेट, ऑटो सेक्टर—सर्वांना मोठा दिलासा मिळू शकतो.
Related Update
Ayodhya Ram Mandir Dhwajarohan | अयोध्येतील राम मंदिरावर ऐतिहासिक ध्वजारोहण; पंतप्रधान मोदींचं भावनिक भाषण
दर कपातीची शक्यता का वाढली?
EMI Cut News | आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज फर्म Morgan Stanley च्या ताज्या अहवालाने या चर्चा अधिक पेटवल्या आहेत.
अहवालानुसार—
- CPI (महागाई निर्देशांक) अपेक्षेपेक्षा कमी
- आर्थिक निर्देशक सकारात्मक
- त्यामुळे RBI ला व्याजदर कमी करण्याची संधी
जर RBI पुढील आठवड्यात 25 बेसिस पॉइंट्स कपात करत असेल तर रेपो रेट 5.25% वर येईल. यामुळे कर्जाचे EMI थेट कमी होतील आणि कर्जदारांना मोठा दिलासा मिळेल.