Lok Adalat 2026 Delhi | 10 जानेवारीला दिल्लीत लोक अदालतीत मोठा दिलासा! ट्रॅफिक चालान माफ होणार? आजच जाणून घ्या प्रक्रिया
Lok Adalat 2026 Delhi
दिल्लीतील वाहनचालकांसाठी मोठी बातमी आहे. राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन 10 जानेवारी 2026 रोजी (शनिवार) करण्यात येणार असून, या दिवशी वाहतूक ई-चालान (Traffic e-Challan) संबंधित प्रकरणांचा जलद निपटारा केला जाणार आहे.
ही लोक अदालत दिल्लीतील सर्व जिल्हा न्यायालय संकुलांमध्ये एकाच दिवशी होणार आहे. छोट्या-मोठ्या ट्रॅफिक नियम उल्लंघनासाठी कोर्टाच्या फेऱ्यांपासून त्रस्त असलेल्या सामान्य नागरिकांना दिलासा देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. मात्र, गंभीर स्वरूपाची प्रकरणे या लोक अदालतीत घेतली जाणार नाहीत.
Lok Adalat Token Registration: अर्ज कसा कराल?
लोक अदालतीसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी अनिवार्य आहे.
अर्ज करण्याची स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया
- अधिकृत वेबसाईटला भेट द्या
https://traffic.delhipolice.gov.in/notice/lokadalat - Online Lok Adalat Application या पर्यायावर क्लिक करा
- अर्जाचा फॉर्म भरा
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- अर्ज सबमिट करा
अर्ज पूर्ण झाल्यानंतर Token Number ई-मेल किंवा मोबाईलवर पाठवला जाईल.
महत्त्वाची तारीख: ही लिंक 05 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे.
मर्यादा:
- दररोज जास्तीत जास्त 45,000 चालान/नोटिस डाउनलोड करता येतील
- एकूण मर्यादा 1,80,000 चालान/नोटिस
सुनावणीच्या दिवशी काय आवश्यक?
- Token Number
- Appointment Letter
- वाहनाची सर्व मूळ कागदपत्रे
- संबंधित चालानाची माहिती
सूचना: Token क्रमांकानुसारच प्रकरणे घेतली जातील. त्यामुळे किमान एक तास आधी न्यायालयात पोहोचण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
आणखी काही बातमी वाचण्यासाठी – click here
लोक अदालत वेगळी का?
- एकाच दिवशी प्रकरण निकाली
- दंडात सवलत किंवा पूर्ण माफी मिळण्याची शक्यता
- कोर्टाची दीर्घ प्रक्रिया नाही
- वारंवार तारखांचा त्रास नाही
मात्र, फक्त अधिकृत पोर्टलवर पात्र ठरलेली चालानेच विचारात घेतली जातील
Related Update
RRB Group D Bharti 2026: 22,000 Railway Jobs | 10वी पास | Online Apply