बातम्या स्थानिक बातम्या ताजी बातमी महाराष्ट्र देश विदेश राजकारण योजना / नोकरी क्रीडा अर्थविश्व टेकतंत्र मनोरंजन लाईफस्टाईल अध्यात्म वेब स्टोरी

Akola Shiv Jayanti 2026 | इतकी मोठी रांगोळी पाहिली आहे का? अकोल्यात शिवरायांचा भव्य अविष्कार 30 हजार स्क्वेअर फूट रांगोळीतून साकारले शिवराय !

On: February 19, 2026 1:56 PM
Follow Us:
Akola Shiv Jayanti 2026
---Advertisement---

Akola Shiv Jayanti 2026 | अकोल्यातील श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोट (Akot college news) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396 व्या जयंतीनिमित्त 30 हजार स्क्वेअर फूट( 30 thousand square feet rangoli )भव्य रांगोळी साकारली. 40 क्विंटल रांगोळी वापरून 15 विद्यार्थ्यांनी 6 दिवसांत उभारला कलाविष्कार.

Akola Shiv Jayanti 2026 अकोल्यात 30 हजार स्क्वेअर फूट शिवाजी महाराज रांगोळी | 40 क्विंटल रंग, Video Viral

अकोला : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अकोल्यात तब्बल ३० हजार स्क्वेअर फूट (Akola Shivaji Maharaj rangoli ) क्षेत्रफळावर शिवरायांची भव्य आणि आकर्षक प्रतिमा साकारण्यात आली आहे. या अनोख्या रांगोळी कलाकृतीसाठी १५ विद्यार्थ्यांनी सलग सहा दिवस अथक परिश्रम घेतले. या भव्य रांगोळीची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होत असून, त्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल होत आहे.

३९६ वा जन्मोत्सव उत्साहात

श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संलग्नित  श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा ३९६ वा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पांडे आणि चतुर्भुज आर्टचे संचालक अनिल काळे यांच्या संकल्पनेतून ही भव्य प्रतिमा उभी राहिली. १५ विद्यार्थ्यांनी सलग सहा दिवस मेहनत घेत हा कलाविष्कार साकारला. गेल्या पाच वर्षांपासून महाविद्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

तुम्ही अर्ज केला का ?
BMC Bharti 2026 : 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! ₹56,900 पगाराची मोठी भरती जाहीर

सलग तिसऱ्या वर्षी भव्य-दिव्य प्रतिमा

Shivaji Maharaj Jayanti 2026 हे महाविद्यालय सलग तिसऱ्या वर्षी अशा भव्य रांगोळीमुळे चर्चेत आहे. या ३० हजार स्क्वेअर फूट प्रतिमेसाठी तब्बल ४० क्विंटल रांगोळी वापरण्यात आली. सर्वप्रथम मैदानाची आखणी करण्यात आली. त्यानंतर प्रतिमेचे बारकाईने रेखाटन करण्यात आले आणि मग रंगीत रांगोळी टाकून महाराजांची सिंहासनावर विराजमान असलेली भव्य प्रतिमा साकारण्यात आली. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी, चतुर्भुज आर्टचे विद्यार्थी आणि कर्मचारी यांनीही परिश्रम घेतले.

हेही वाचा
Vande Mataram New Rules 2025 : 3 मिनिटे 10 सेकंद उभे राहणे अनिवार्य | केंद्र सरकारचे नवे निर्देश

आणखी काही बातमी वाचण्यासाठी – click here 

Reporter

मी पत्रकार. राजकारण, क्रीडा, गॅजेट्स, सोशल मीडिया, स्टार्टअप्स, अर्थव्यवस्था आणि जागतिक घडामोडींवर लक्ष ठेवतो/ठेवते. माझा हेतू वाचकांना विश्वासार्ह, सोप्या आणि आकर्षक भाषेत ताज्या बातम्या पोहोचवणे आहे."

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment

साप्ताहिक राशिभविष्य 27 Oct – 2 Nov 2025: पैसा, नोकरी, फ्लॅट! तुमचं नशीब काय सांगतं? Samsung ने लॉन्च केला जबरदस्त Galaxy XR हेडसेट “20 ते 26 ऑक्टोबर 2025 साप्ताहिक राशीभविष्य | महालक्ष्मी योगात चमकणार ७ राशींचं नशीब!” महाराष्ट्रातील १० प्रसिद्ध आणि सर्वात मोठे किल्ले | Top 10 Forts in Maharashtra सई ताम्हणकरचा धनत्रयोदशी लूक पारंपरिक 💛 मेंदी रंगाच्या घागरामध्ये मंत्रमुग्ध करणारा अंदाज आदित्य-मंगल योग 2025: भाग्याचा आठवडा सुरू