Nepal 250 years history हिमालयाच्या कुशीत वसलेलं नेपाळ हे लहानसं राष्ट्र… पण गेल्या 250 वर्षांचा त्याचा राजकीय प्रवास थरारक सिनेमापेक्षाही कमी नाही. कधी राजेशाही, कधी राणाशाही, कधी माओवाद तर कधी लोकशाहीची चढ-उतारं – नेपाळचं राजकारण कायम वादळातच राहिलं आहे.
भारत आणि चीन या दोन महाकाय देशांच्या मधोमध असलेलं नेपाळ भौगोलिक दृष्ट्या महत्त्वाचं आहे. जगातील 14 पैकी 8 सर्वाधिक उंच पर्वतशिखरं याच देशात आहेत. त्यातलं जगातील सर्वोच्च शिखर ‘सागरमाथा’ (माउंट एव्हरेस्ट) ही नेपाळचीच शान. पण नेपाळचा इतिहास केवळ पर्वतशिखरांचा नाही, तर राजकारणाच्या चढ-उतारांचाही आहे.
Nepal 250 years history पृथ्वी नारायण शाह आणि आधुनिक नेपाळची सुरुवात
1765 मध्ये गोरखा राजा पृथ्वी नारायण शाह यांनी लहान-लहान राज्यांना एकत्र करून नेपाळच्या एकीकरणाची मोहीम सुरू केली. फक्त तीन वर्षांत म्हणजेच 1768 पर्यंत ते यशस्वी झाले आणि आधुनिक नेपाळचा पाया रचला गेला.
मात्र, पुढे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीशी संघर्ष ओढावला. 1815 मध्ये झालेल्या युद्धानंतर ‘सुगौली करार’ झाला आणि नेपाळला काही भाग ब्रिटिशांना द्यावा लागला.
🔥 जंग बहादूर राणा आणि राणाशाही
1846 मध्ये कट-कारस्थान, रक्तपात आणि सत्तासंघर्षाच्या खेळातून जंग बहादूर राणा पुढे आले. हळूहळू पंतप्रधानपद राणा घराण्याच्या हातात वंशपरंपरेनं गेलं. इंग्रजांना दिलेल्या साथीनं त्यांचा दबदबा वाढला. परिणामी 1923 मध्ये ब्रिटननं नेपाळचं स्वातंत्र्य मान्य केलं.
✊ लोकशाहीची पहाट
1940 च्या दशकात लोकशाही चळवळीला सुरुवात झाली. भारताच्या मदतीनं राजा त्रिभुवन यांना गादीवर बसवण्यात आलं आणि काँग्रेसचं सरकार आले. पण राजघराणं आणि सरकारमध्ये संघर्ष सुरूच राहिला.
1959 मध्ये राजा महेंद्र यांनी लोकशाही संपवून ‘पंचायत व्यवस्था’ आणली. मात्र 1989 मध्ये पुन्हा लोकशाही आंदोलन उभं राहिलं.
💔 राजमहालातील हत्याकांड
1 जून 2001 ला नेपाळ हादरून गेला. काठमांडूच्या राजप्रासादात झालेल्या सामूहिक हत्याकांडात राजा बीरेंद्र, राणी ऐश्वर्या, युवराज दीपेंद्र यांच्यासह अनेकांचा मृत्यू झाला. त्यानंतर ज्ञानेंद्र शाह गादीवर आले.
मात्र, 2005 मध्ये त्यांनी सत्ता आपल्या हातात घेतली. लोकशाहीकडे जाणारा मार्ग पुन्हा थांबला.
✌️ प्रजासत्ताकाचा जन्म
2006 मध्ये सरकार आणि माओवादी यांच्यात शांतता करार झाला. 2007 मध्ये माओवादी राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आले. शेवटी 2008 मध्ये नेपाळने ‘प्रजासत्ताक’ स्वीकारलं.
2015 मध्ये नवीन संविधान लागू झालं आणि केपी शर्मा ओली हे पहिले निवडून आलेले पंतप्रधान ठरले.
📱 सोशल मीडिया बंदी आणि उठाव
सप्टेंबर 2025 मध्ये सरकारनं थेट 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली. यात फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲपसारखे लोकप्रिय ॲप्स होते. फक्त टिकटॉकनं अटी मान्य केल्यामुळे ते सुरू ठेवण्यात आलं.
या निर्णयानं तरुणाई पेटली. आंदोलकांनी टिकटॉकवरूनच व्हिडिओ टाकत लोकांना आंदोलनात उतरायला आवाहन केलं. ‘नेपो बेबी’ नावाचा ट्रेंड व्हायरल झाला, ज्यात नेत्यांच्या मुलांची ऐशआरामाची जीवनशैली दाखवून नेत्यांवर प्रश्न उपस्थित केले गेले.
निदर्शनं हिंसक झाली, अनेकांचा मृत्यू झाला. परिस्थिती बिघडल्यामुळे अखेर पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला.
⚡ थोडक्यात…
- नेपाळचा इतिहास म्हणजे सत्ता, कटकारस्थानं, राजेशाही, बंडखोरी आणि आंदोलनांची मालिकाच!
- 250 वर्षांत नेपाळनं राजेशाहीतून प्रजासत्ताकापर्यंतचा प्रवास केला.
- आजही तिथलं राजकारण अस्थिर आहे आणि जनतेची नाराजी वाढत चालली आहे.