Terrace Open Rules Mumbai मुंबईत आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना इमारतींचे टेरेस खुले ठेवणे आवश्यक असल्याचे अग्निशमन दलाने स्पष्ट केले आहे. विकास नियंत्रण नियमावली काय सांगते? जाणून घ्या संपूर्ण माहिती.
Terrace Open Rules Mumbai
आगीच्या घटनांमध्ये वाढ; इमारतीचे टेरेस खुले ठेवणे आवश्यक? नियमावलीत काय नमूद?
मुंबई: राज्यासह देशभरात आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना इमारतींमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. छोट्या इमारतींमधील टेरेस खुले ठेवणे विकास नियंत्रण नियमावलीनुसार आवश्यक असल्याचे मुंबई अग्निशमन दलाने स्पष्ट केले आहे. Mumbai Housing Society News यासंदर्भात दादरमधील एका सहकारी गृहनिर्माण संस्थेला अग्निशमन दलाने पत्रही दिले आहे.
दिल्लीतील एका भीषण आगीच्या दुर्घटनेत टेरेस कुलूपबंद असल्याने २२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यानंतर दादर येथील एका रहिवाशाने तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत मुंबई अग्निशमन दलाने संबंधित इमारतीच्या टेरेसवरील कुलूप काढण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, टेरेस कुलूपबंद ठेवण्याचा निर्णय संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला असल्याने तो योग्य असल्याचा दावा संस्थेच्या सचिवांनी केला आहे.
दादरमधील सहकारी संस्थेचा वाद
Fire Safety Rules Maharashtra दादर पश्चिम येथील समृद्धी सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये तळ अधिक तीन मजल्यांच्या सात आणि तळ अधिक सात मजल्यांची एक अशा एकूण आठ विंग आहेत. सुमारे ५५ वर्षे जुन्या या इमारतींमध्ये अग्निसुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या अनेक उपाययोजना नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे, विजेच्या मीटरची खोलीही प्रवेशद्वाराजवळ असल्याने आग लागल्यास रहिवाशांना इमारतीबाहेर किंवा टेरेसवर जाण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. मात्र टेरेस कुलूपबंद असल्याने आपत्कालीन परिस्थितीत रहिवाशांसमोर मोठी अडचण निर्माण होऊ शकते.
यामुळे काही सदस्यांनी टेरेस कायम खुले ठेवण्याची मागणी केली होती. परंतु संस्थेकडून याबाबत प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी थेट अग्निशमन दलाकडे तक्रार दाखल केली.
नियमावलीत काय नमूद?
Mumbai Building Terrace Rules तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, विकास नियंत्रण नियमावलीनुसार ३२ मीटरपर्यंत उंची असलेल्या इमारतींमध्ये टेरेसचा वापर ‘रेफ्युज एरिया’ म्हणून करता येतो. त्यामुळे अशा टेरेसला कायमस्वरूपी कुलूप लावणे नियमांच्या विरोधात असल्याचे त्यांनी नमूद केले. याच मुद्द्याचा आधार घेत अग्निशमन दलाकडे तक्रार करण्यात आली होती. तपासणीनंतर अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी टेरेस कुलूपबंद ठेवता येणार नाही, असे स्पष्ट आदेश दिले आहेत.
आणखी काही बातमी वाचण्यासाठी – click here
रहिवाशांचा आरोप
Fire Safety News अग्निशमन दलाचे आदेश मिळाल्यानंतरही संबंधित सहकारी संस्था टेरेस खुले करण्यास तयार नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले असून, इमारतींच्या सुरक्षेबाबतचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
हेही वाचा
Jalgaon railway news | पाळधी स्टेशनवर ‘देवदूत’! 3 तास अडकलेल्या प्रवाशांची तहान 250 जारने भागवली