बातम्या स्थानिक बातम्या ताजी बातमी महाराष्ट्र देश विदेश राजकारण योजना / नोकरी क्रीडा अर्थविश्व टेकतंत्र मनोरंजन लाईफस्टाईल अध्यात्म वेब स्टोरी

Rohit Sharma Record: 🔥 फक्त 7 धावा! रोहित शर्मा करणार ‘दादा’ गांगुलींना मागे – ऐतिहासिक क्षण जवळ

On: January 5, 2026 12:43 PM
Follow Us:
Rohit Sharma
---Advertisement---

Rohit Sharma Record न्यूझीलंडविरुद्ध रोहित शर्माकडे मोठा विक्रम! फक्त 7 धावा केल्यास सौरव गांगुलींना मागे टाकणार – संपूर्ण माहिती वाचा.

Rohit Sharma Record: फक्त 7 धावा आणि गांगुलींचा विक्रम मोडणार!

Rohit Sharma Marathi News : रोहित शर्मा (rohit sharma) याने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकांमध्ये जबरदस्त कामगिरी करत चाहत्यांची मने जिंकली. आता न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी रोहितची निवड झाली असून, त्याच्याकडून पुन्हा एकदा दमदार फलंदाजीची अपेक्षा आहे.

कसोटी आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित सध्या फक्त एकदिवसीय क्रिकेटवर पूर्ण लक्ष केंद्रित करत आहे. याच मालिकेत त्याच्याकडे एक मोठा विक्रम करण्याची सुवर्णसंधी आहे.

रोहित शर्माने आतापर्यंत न्यूझीलंडविरुद्ध 31 एकदिवसीय सामने खेळले असून त्यामध्ये त्याने 1073 धावा केल्या आहेत. तर भारतीय क्रिकेटमधील दिग्गज सौरव गांगुली यांनी न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण 1079 धावा केल्या होत्या. आता जर रोहितने आगामी मालिकेत फक्त 7 धावा केल्या, तर तो न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरेल.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत रोहितने शानदार कामगिरी केली होती. तिसऱ्या सामन्यात त्याने 121 धावांची झुंजार खेळी केली आणि त्याला मालिकावीराचा पुरस्कारही मिळाला. यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याने दोन अर्धशतके झळकावत भारताच्या मालिका विजयात मोलाचा वाटा उचलला. पहिल्या सामन्यात 57 तर दुसऱ्या सामन्यात 75 धावांची खेळी त्याने केली.

आणखी काही बातमी वाचण्यासाठी – click here 

Rohit Sharma New Zealand Record | 2007 साली एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या रोहित शर्माने आतापर्यंत 279 एकदिवसीय सामन्यांमध्ये 11,516 धावा केल्या आहेत. त्यामध्ये 33 शतके आणि 61 अर्धशतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतके झळकावणारा रोहित शर्मा हा एकमेव खेळाडू आहे.

Related Update
IPL 2026: शार्दुल ठाकूरची मुंबई इंडियन्समध्ये भव्य एन्ट्री! MI ने दिले तब्बल 2 कोटी — पूर्ण डील पहा !

Reporter

मी पत्रकार. राजकारण, क्रीडा, गॅजेट्स, सोशल मीडिया, स्टार्टअप्स, अर्थव्यवस्था आणि जागतिक घडामोडींवर लक्ष ठेवतो/ठेवते. माझा हेतू वाचकांना विश्वासार्ह, सोप्या आणि आकर्षक भाषेत ताज्या बातम्या पोहोचवणे आहे."

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment

साप्ताहिक राशिभविष्य 27 Oct – 2 Nov 2025: पैसा, नोकरी, फ्लॅट! तुमचं नशीब काय सांगतं? Samsung ने लॉन्च केला जबरदस्त Galaxy XR हेडसेट “20 ते 26 ऑक्टोबर 2025 साप्ताहिक राशीभविष्य | महालक्ष्मी योगात चमकणार ७ राशींचं नशीब!” महाराष्ट्रातील १० प्रसिद्ध आणि सर्वात मोठे किल्ले | Top 10 Forts in Maharashtra सई ताम्हणकरचा धनत्रयोदशी लूक पारंपरिक 💛 मेंदी रंगाच्या घागरामध्ये मंत्रमुग्ध करणारा अंदाज आदित्य-मंगल योग 2025: भाग्याचा आठवडा सुरू