Nobel Prize 2025 Winner जाहीर! अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नाकारून व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचाडो यांना शांततेसाठीचा सन्मान. जाणून घ्या त्यांचा प्रेरणादायी प्रवास.
नोबेल शांतता पुरस्कार 2025 | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक वेळा दावा केला होता की त्यांनी जगभरातील युद्धं शांततेच्या मार्गाने थांबवली आहेत आणि त्यामुळे त्यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळायलाच हवा. पण, नॉर्वेजियन नोबेल समितीने त्यांच्या या आशांवर पाणी फेरत व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचाडो यांना 2025 चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर केला आहे.
शुक्रवारी ओस्लो येथे समितीने औपचारिक घोषणा करत सांगितले की, मचाडो यांनी “व्हेनेझुएलातील नागरिकांच्या लोकशाही हक्कांसाठी आणि हुकूमशाहीविरुद्ध शांततेच्या मार्गाने लढा देत लोकशाहीकडे न्याय्य संक्रमण घडवून आणण्यासाठी” हा पुरस्कार मिळवला आहे.
Nobel Prize 2025 Winner |338 नामांकनांमधून मचाडो यांची निवड
Nobel Prize 2025 | नॉर्वेजियन नोबेल समितीकडे यंदा एकूण ३३८ नामांकने आली होती, ज्यात २४४ व्यक्ती आणि ९४ संस्था सहभागी होत्या. या स्पर्धात्मक यादीतून मचाडो यांची निवड हा जगभरातील लोकशाहीप्रेमींसाठी प्रेरणादायी क्षण ठरला आहे.
‘व्हेनेझुएलाची आयर्न लेडी’
Venezuela Iron Lady मारिया कोरिना मचाडो यांना व्हेनेझुएलामध्ये ‘आयर्न लेडी’ म्हणून ओळखले जाते. त्यांनी देशातील हुकूमशाहीविरोधात शांततामय आणि लोकशाहीवादी चळवळीचं नेतृत्व केलं आहे.
टाईम मासिकाने नुकतेच जाहीर केलेल्या ‘२०२५ च्या १०० सर्वात प्रभावशाली व्यक्ती’ या यादीत मचाडो यांचं नाव झळकले होते. त्यामुळे नोबेल पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांची जागतिक प्रतिमा आणखी बळकट झाली आहे.
लोकशाहीसाठी अखंड संघर्ष
Maria Corina Machado | मचाडो गेल्या दोन दशकांपासून व्हेनेझुएलातील लोकशाही आणि मानवी हक्कांसाठी झटत आहेत. त्यांनी सरकारच्या अन्यायकारक धोरणांविरोधात शांततामय निदर्शने केली, जनतेला जागृत केलं आणि देशाला लोकशाही मार्गावर नेण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाठिंबा मिळवला.
त्यांच्या या निडर लढ्यामुळेच त्यांना आज जागतिक पातळीवर ‘लोकशाही योद्धा’ म्हटलं जातं.
डोनाल्ड ट्रम्प यांचा अपेक्षाभंग
दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही महिन्यांपासून स्वतःला या पुरस्काराचे सर्वाधिक पात्र उमेदवार म्हणत होते. त्यांनी भारत-पाकिस्तान, इस्रायल-पॅलेस्टाईन यांसारख्या देशांमध्ये तणाव कमी केल्याचा दावा केला होता.
अमेरिकेत झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतही त्यांनी “मी जगभरातील युद्धं थांबवली आहेत, लाखो लोकांचे जीव वाचवले आहेत, म्हणून नोबेल पुरस्कार माझाच हक्क आहे” असं विधान केलं होतं.
मात्र, नोबेल समितीने त्यांच्या या आत्मप्रचाराला फारसं महत्त्व न देता, शांततेसाठी खऱ्या अर्थाने कार्य करणाऱ्या मचाडो यांना गौरविलं. त्यामुळे ट्रम्प समर्थकांमध्ये नाराजी तर मचाडो समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
समितीचं निवेदन
नोबेल समितीने आपल्या निवेदनात म्हटलं आहे,
“व्हेनेझुएलाच्या नागरिकांच्या लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी, आणि हुकूमशाहीतून लोकशाहीकडे न्याय्य व शांततापूर्ण मार्गाने जाण्यासाठी केलेल्या संघर्षाबद्दल मचाडो यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.”
हेही वाचा
philippines earthquake 2025 | फिलिपाईन्समध्ये 7.6 तीव्रतेचा भूकंप! दावाओ हादरलं, त्सुनामीचा इशारा
आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया
पुरस्काराच्या घोषणेनंतर लॅटिन अमेरिकन देशांपासून युरोपपर्यंत मचाडो यांच्या विजयाचं स्वागत करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर #MariaCorinaMachado आणि #NobelPeacePrize हे हॅशटॅग ट्रेंडमध्ये आले आहेत.