बातम्या स्थानिक बातम्या ताजी बातमी महाराष्ट्र देश विदेश राजकारण योजना / नोकरी क्रीडा अर्थविश्व टेकतंत्र मनोरंजन लाईफस्टाईल अध्यात्म वेब स्टोरी

26/11 Mumbai Attack – मुंबई हल्ला: त्या रात्रीने बदलून टाकलेली शहराची ओळख! नेमकं काय घडलं होतं ?

On: November 26, 2025 2:03 PM
Follow Us:
2611 Mumbai Attack
---Advertisement---

26/11 Mumbai Attack: 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात काय घडलं, कोणत्या ठिकाणी हल्ले झाले, किती मृत्यू, सुरक्षा दलाची कारवाई आणि त्या काळजाला थरकाप उडवणाऱ्या रात्रीची संपूर्ण माहिती येथे वाचा. मुंबई 26/11 दहशतवादी हल्ला: त्या रात्री मुंबईला हादरवणारी कहाणी

26/11 Mumbai Attack: मुंबईला थरकाप उडवणारी ती रात्र

26/11 history in marathi – 26 नोव्हेंबर 2008 – प्रत्येक मुंबईकरासाठी, प्रत्येक भारतीयासाठी काळजाला चिरून टाकणारी तारीख. त्या रात्री जे काही मुंबईत घडलं, त्याच्या जखमा अजूनही आहेत आणि त्या पुनःपुन्हा आठवणींच्या रूपाने बोचतात. ( Mumbai Attack History 26/11)  हा फक्त एक हल्ला नव्हता; ती संपूर्ण राष्ट्रावर चालवलेली भीषण दहशत मोहिम होती. Mumbai Terror Attack 2008 – लष्कर-ए-तैयबाचे प्रशिक्षित दहा सशस्त्र दहशतवादी पाकिस्तानातून समुद्रमार्गे भारतात घुसले आणि मुंबईतील प्रतिष्ठित ठिकाणांवर समन्वित हल्ले केले. सलग चार दिवस, जवळपास 60 तासांपेक्षा जास्त वेळ सुरू राहिलेल्या या हल्ल्यात 160 हून अधिक लोकांना जीव गमवावा लागला. अचानक सुरू झालेल्या गोळीबाराने शहराला धक्का बसला आणि मुंबई एका अनोख्या युद्धभूमीत परिवर्तित झाली. लिओपोल्ड कॅफे, छत्रपती शिवाजी टर्मिनस, ताजमहाल हॉटेल, ओबेरॉय हॉटेल, कामा हॉस्पिटल आणि नरिमन हाऊस—हे ठिकाण त्या रात्री मृत्यूचे रणांगण झाले होते. त्या भयंकर रात्री नेमकं काय घडलं? कुठे, कसा आणि कोणत्या प्रकारे हल्ला झाला? चला जाणून घेऊया.

लिओपोल्ड कॅफे – गोळीबाराची पहिली ठिणगी

मुंबई पोलिसांच्या तपासणीनुसार, दहशतवादी दोन गटांमध्ये विभागले होते. यातील एक गट लिओपोल्ड कॅफेमध्ये पोहोचला. परदेशी पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेल्या या कॅफेमध्ये त्या संध्याकाळी नेहमीप्रमाणे गर्दी होती. क्षणातच दहशतवादी आत घुसले आणि अंधाधुंद गोळीबार सुरू केला. काहीच कळण्याआधी अनेक लोक जमिनीवर कोसळले. अधिकृत आकडेवारीनुसार या हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू झाला.

छत्रपती शिवाजी टर्मिनस – सर्वसामान्यांचा नरसंहार

CST Attack Mumbai – त्याचवेळी दोन दहशतवादी नागरिकांनी गजबजलेले सीएसटी स्टेशनकडे वळले. हे भारतातील सर्वांत व्यग्र रेल्वे स्टेशन असल्यामुळे हजारो लोक उपस्थित होते. अजमल कसाब आणि इस्माईल खान यांनी येथेही मशीनगनने गोळीबार केला, ज्याने भीतीचं सावट पसरलं. लोक पळत होते, पडत होते, कुणाला वाटत होते की समोर युद्ध सुरू आहे. या ठिकाणी 58 जणांचा मृत्यू झाला. कसाब जिवंत पकडला गेला, तर इस्माईल खान एनकाउंटरमध्ये ठार झाला.

ओबेरॉय ट्रायडेंट – 350 पेक्षा जास्त लोक ओलीस

Oberoi Hotel Attack बिझनेस क्लासमध्ये प्रसिद्ध असलेल्या ओबेरॉय हॉटेलमध्ये दहशतवाद्यांनी मोठ्या प्रमाणावर दारूगोळा घेऊन प्रवेश केला. हॉटेलमध्ये त्यावेळी 350 पेक्षा अधिक लोक उपस्थित होते. दहशतवाद्यांनी अनेकांना ओलीस ठेवलं आणि 24 तासांपेक्षा जास्त काळ चाललेल्या शस्त्रसंधीत NSG कमांडोंनी दोन्ही दहशतवाद्यांना ठार केलं.

ताजमहाल पॅलेस – जळणारा घुमट, रक्तरंजित रात्रीची साक्ष

Taj Hotel Attack – 26/11 म्हटलं की सर्वप्रथम ज्याचा फोटो डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे ताजमहाल हॉटेलचा धगधगता घुमट. 105 वर्षं जुनं, परदेशी पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेलं ताज त्या रात्री रणभूमी बनलं. हॉटेलमध्ये जेवण चालू होतं, लोक मस्त वातावरणाचा आनंद घेत होते, आणि अचानक गोळीबार, स्फोटांनी वातावरण गोंधळून गेलं.  सरकारी आकडेवारीनुसार या हॉटेलमध्ये 31 जणांचा मृत्यू झाला, तर चारही दहशतवादी कमांडोंकडून मारले गेले.

कामा हॉस्पिटल – शूर पोलिसांची बलिदानभूमी

1880 साली स्थापन झालेलं कामा हॉस्पिटल एक चॅरिटेबल संस्था असून, शांत परिसरात असलेलं हे हॉस्पिटल त्या रात्री युद्धभूमीत बदललं. दहशतवादी पोलिस व्हॅन चोरून येथे पोहोचले आणि बाहेरच पोलिसांशी चकमक सुरू झाली. याच ठिकाणी दहशतवादाविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, अ‍ॅडिशनल कमिशनर अशोक कामटे आणि माफिया तस्करीविरोधात लढलेले धाडसी अधिकारी विजय साळसकर शहीद झाले.

नरिमन हाऊस – ज्यू सेंटरला लक्ष्य करणारा हल्ला

Nariman House Attack – चबाड लुबाविच सेंटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नरिमन हाऊसमध्ये ज्यू धार्मिक क्रियाकलाप चालतात. येथे ज्यू पर्यटकांसाठी निवासाची सोयही आहे. दहशतवादी या इमारतीत घुसले, अनेकांना ओलीस ठेवले आणि विशाल नुकसान केलं.  कारवाईसाठी NSG कमांडोंना हेलिकॉप्टरने वरच्या इमारतीवर उतरवण्यात आले.या कारवाईत सात लोक मारले गेले आणि दोन दहशतवादी ठार झाले.  ज्यू सेंटरचे प्रमुख गॅवरिल होल्त्झबर्ग, पत्नी रिवका, दुर्दैवाने मृत्युमुखी पडले, पण त्यांचा दोन वर्षांचा मुलगा मोशे वाचवण्यात यश आलं.

Related Update
RBI ची मोठी खुशखबर? EMI कमी होणार! रेपो रेट कपातीचे संकेत, करोडो कर्जदारांना दिलासा

हल्ला संपला, पण जखमा कायम

Mumbai Attack History – एकूण 60 तास चाललेल्या या हल्ल्यात पोलिस, NSG, मरीन कमांडो, फायर ब्रिगेड आणि अनेक सामान्य नागरिकांनी धोक्याची तमा न बाळगता लोकांना वाचवलं. अनेक शहीद झाले, अनेक कुटुंब उध्वस्त झाली.आजही 26/11 चा दिवस आपल्याला सुरक्षा, धैर्य आणि सावधानतेचा धडा देऊन जातो.

हेही वाचा
अयोध्येतील राम मंदिरावर ऐतिहासिक ध्वजारोहण; पंतप्रधान मोदींचं भावनिक भाषण

Reporter

मी पत्रकार. राजकारण, क्रीडा, गॅजेट्स, सोशल मीडिया, स्टार्टअप्स, अर्थव्यवस्था आणि जागतिक घडामोडींवर लक्ष ठेवतो/ठेवते. माझा हेतू वाचकांना विश्वासार्ह, सोप्या आणि आकर्षक भाषेत ताज्या बातम्या पोहोचवणे आहे."

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment

साप्ताहिक राशिभविष्य 27 Oct – 2 Nov 2025: पैसा, नोकरी, फ्लॅट! तुमचं नशीब काय सांगतं? Samsung ने लॉन्च केला जबरदस्त Galaxy XR हेडसेट “20 ते 26 ऑक्टोबर 2025 साप्ताहिक राशीभविष्य | महालक्ष्मी योगात चमकणार ७ राशींचं नशीब!” महाराष्ट्रातील १० प्रसिद्ध आणि सर्वात मोठे किल्ले | Top 10 Forts in Maharashtra सई ताम्हणकरचा धनत्रयोदशी लूक पारंपरिक 💛 मेंदी रंगाच्या घागरामध्ये मंत्रमुग्ध करणारा अंदाज आदित्य-मंगल योग 2025: भाग्याचा आठवडा सुरू